Entertainment

दुसऱ्या आठवड्यातही ‘दशमी’ची यशस्वी घोडदौड!

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या आणि आशयपूर्ण विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच पसंती मिळत आली आहे. याच परंपरेत सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या ‘दशमी’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप उमटवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या चित्रपटाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड सुरू असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे, एकाच वेळी तब्बल सहा चित्रपट प्रदर्शित झालेले असताना आणि हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचीही मोठी स्पर्धा असताना ‘दशमी’ने आपली पकड कायम ठेवली आहे. या स्पर्धात्मक वातावरणातही मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेली पसंती ही त्याच्या यशाची महत्त्वाची पावती ठरत आहे.सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात चित्रपट यशस्वी होत आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत आणि योगेश भोसले दिग्दर्शित ‘दशमी’ हा चित्रपट सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तव यांचा वेगळा अनुभव देतो. वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शन, थरारक अॅक्शन दृश्ये, उत्कंठावर्धक पटकथा आणि प्रभावी संकलन यामुळे चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो.

मकरंद अनासपुरे, गौरी इंगवले, महेश मांजरेकर, विजय निकम, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेते रवि प्रकाश यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेला दिलेली स्वतंत्र ओळख चित्रपटाला अधिक प्रभावी बनवते.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसह अनेक शहरांतील चित्रपटगृहांमध्ये ‘दशमी’विषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. वेगळे कथानक, उत्कंठावर्धक मांडणी आणि अनपेक्षित वळणांमुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रसारमाध्यमांकडूनही चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शनाचे कौतुक होत असून, सकारात्मक समीक्षणांमुळे चित्रपटाची चर्चा अधिक रंगत आहे. चित्रपटातील उत्कंठावर्धक प्रसंग, अनपेक्षित वळणे, व्यक्तिरेखांमधील गुंतागुंत आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू ठरत आहे.

GExpressNews | The latest news from India and around the world. Latest India news on Bollywood, Politics, Business, Cricket, Technology and Travel.

Related Posts

1 of 39

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *